Monday, June 24, 2024

कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालय यांच्यावतीने रक्तदान शिबीरात 668 बाटल्यांचे संकलन

- Advertisement -

कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालय यांच्यावतीने काल दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उत्स्फूर्तपणे हे रक्तदान शिबरी पार पडले.

गेल्या अनेक वर्षापासून “रक्ताची नाती जपुया” या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मागील वर्षी विक्रमी 555 बाटल्यांचे संकलन केले होते. याचा गरजू रक्तग्राही यांना उपयोग झाला. या उदांत समर्पण भावनेतून यावर्षीही महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवार करण्यात आले होते. या वर्षीही 668 बाटल्यांचे संकलन करण्यात आले. अनेकांनी समर्पित भावनेने यामध्ये सहभाग नोंदविला होता.

ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि यापुढे हे काम असेच अविरतपणे चालू राहील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या रक्तदान शिबिरामध्ये समाजातील जेष्ठ मान्यवर तसेच विविध पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles