तलाठी भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तलाठी भरती मधील आरोपी राजू नागरे हा अट्टल पेपर फोड्या आहे. 6 ते 7 वर्षापासून तो पेपर फोडत आला आहे. 6 वर्षापासून त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. आताही तो मुंबई पोलीस भरती घोटाळा, वनभरती घोटाळा मध्ये सुध्दा आरोपी आहे. तलाठी मध्ये ज्यावेळी याला अटक करण्यात आली होती त्यावेळी याला सोडून द्या असा कॉल मंत्रालयातून आला होता. असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
“हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.” असे आरोप त्यांनी एक्सवर केले आहेत. | Talathi Exam
आमदार अपात्रतेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू; काही तासांत राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार
महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा मोठा राजकीय भूकंप होणार? |Girish Mahajan
दरम्यान आता विद्यार्थ्यांच्याकडून याचा निषेध करण्यात येत आहे. आज चंद्रपूर मधील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे तलाठी भरती निकालाची होळी करण्यात आली. तर उदय मुंबई मध्ये आम आदमी पार्टी मार्फत पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्यात येणार आहे.