आमदार अपात्रतेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू; काही तासांत राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार

0 5

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रतेवर निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. येत्या 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल देणार आहेत. दुपारी 4 वाजता हा निर्णय येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याचा निकाल लवकरच होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर सुनावणी सुरू होती. त्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे सुपूर्द करून शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचे कौल दिला होता. शिंदे गटाने शिवसेनेत फूट पडलेलीच नाही, असा युक्तिवाद करून शिवसेनेत आम्ही नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकमेकांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याची कारवाई करा अशी मागणी आहे. तसे झाले तर आमदाराची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येईल. 

Leave A Reply

Your email address will not be published.