कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्ष: पाटील विरुद्ध महाडिक

102

कोल्हापूर शहर आणि त्याच्या लगतचा ग्रामीण भाग मिळून तयार झालेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ 2009 साली लोकसंख्या आधारावर निर्माण करण्यात आला आहे. या मतदारसंघात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रमुख पक्ष आहेत. मात्र, मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यात असते आणि विशेषतः बंटी पाटील आणि महाडिक घराण्यातील असते.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा 2009 निवडणुक निकाल

2009 साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील आणि अपक्ष उमेदवार धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

उमेदवारपक्षमतेटक्केवारी
सतेज पाटीलकाँग्रेस8694945.50%
धनंजय महाडिकअपक्ष8118242.47%

कोल्हापूर दक्षिण विधानसभा 2014 निवडणुक निकाल

2014 साली भारतात मोदी लाट होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोल्हापूर दक्षिणमध्ये अनपेक्षित निकाल लागला. सतेज पाटील यांचा पराभव करून अमल महाडिक 8,528 मतांनी निवडून आले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा 2019 निवडणुक निकाल

उमेदवारपक्षमतेटक्केवारी
ऋतुराज पाटीलकॉंग्रेस14010357.5%
अमल महाडिकभाजप9739440.00%

2019 साली, सतेज पाटील यांनी विधान परिषदेवर जाऊन आपल्या पुतण्याला, ऋतुराज पाटील यांना या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उभे केले. यामध्ये ऋतुराज पाटील 1,40,103 मते मिळवून विजयी झाले, तर अमल महाडिक यांना 97,394 मते मिळाली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी आपला संपर्क वाढवून प्रचार केला होता, मात्र 2019 मध्ये पराभूत झालेला फरक कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना महायुतीच्या उमेदवारास मताधिक्य देता आले नाही.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा 2024 लढत कशी असेल

2024 कोल्हापूर लोकसभेचा विचार केला असता बंटी पाटील यांना अपेक्षित मतदान मिळालेले नाही. याउलट अमल महाडीक यांची यंत्रणा लावून या मतदारसंघात विधानसभेची यंत्रणा राबवली आहे. पण आता लोकसभेचा अंदाज पाहता पाटील गटाने पुन्हा दक्षिणेवर ताबा मिळवणीसाठी बैठक सुरू केल्याचे म्हंटले जात आहे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत महाडीक गटाकडून म्हणजेच भारतीय जनता पार्टी कडून अमल महाडीक, शौमिका महाडीक यांची चर्चा चालू असल्याचे दिसत आहे. तर कॉँग्रेस कडून ऋतुराज पाटील, सतेज पाटील, शारंधर देशमुख यांच्या नावाची चर्चा चालू आहे.