Wednesday, October 23, 2024

महाराष्ट्र सदनातील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचा दसरा चौक येथे आनंदोत्सव

- Advertisement -

कोल्हापूर दि. ६ कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीच्या दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळ्याची सध्या वर्तमानपत्रातून चर्चा सुरु आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदना मधील पुतळा महाराजांच्या धिप्पाड व्यक्तीमत्वाला ठेच पोहोचवणार आहे, याविषयी भाजपा कोल्हापूरच्या वतीने दिल्ली येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा तत्काळ बदला असे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील यांना सुद्धा याविषयी इमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले होते.

याच विषयाला अनुसरून चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराष्ट्र सरकार लवकरच बदलणार असल्याबाबत जाहीर केले. या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने दसरा चौक याठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहूल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, लोकराजा छत्रपती शाहू महाराज कि जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज कि जय अशा घोषणा देत दसरा चौक दणाणून सोडत, साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव बोलताना म्हणाले, संपूर्ण देशभरातून शाहू प्रेमींच्या माध्यमातून दिल्ली महाराष्ट्र सदन मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्यात यावा हि मागणी जोर धरू लागली होती. भाजपा कोल्हापूरच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना याविषयी पत्र पाठवून याबाबतची मागणी करण्यात आली होती. शाहूप्रेमी जनतेच्या मागणीचा सकारात्मक विचार करत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा पुतळा बदलण्याच्या विषयात सरकारने दाखवलेली तत्परता यातूनच हे सरकार संवेदनशील असल्याचे दिसते. शाहूप्रेमींना दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कोल्हापूरचे सुपुत्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, कोल्हापूर शहराच्या समस्त शाहू प्रेमी जनतेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर या पूतळ्याबाबत सर्वप्रथम दैनिक लोकमत व अन्य वर्तमान पत्रांनी विषयाला वाचा फोडल्या बद्दल प्रसार माध्यमांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, माधुरी नकाते, दिग्विजय कालेकर, अभिजित शिंदे, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, रुपाराणी निकम, गिरीष साळोखे, अनिल कामत, अमोल पालोजी, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, किरण नकाते, सतीश आंबर्डेकर, शामली भाकरे, श्वेता गायकवाड, पद्मजा गुहाघरकर, सरिता हरुगले, छाया ननवरे, नरेंद्र पाटील, दिलीप बोंद्रे, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, सचिन सुतार, विवेक कुलकर्णी, अजित सूर्यवंशी, सुमित पारखे, प्रीतम यादव, ओंकार खराडे, धीरज पाटील, महादेव बिरंजे, बंकट सूर्यवंशी, बापू राणे, संदीप व्हडगे, विश्वजीत पवार, युवराज शिंदे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles