Thursday, November 21, 2024

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना; ऑनलाइन अर्ज, पात्रता | Beti bachao beti padhao scheme

- Advertisement -

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील मुलींना जीवनाचे नवे रूप मिळणार आहे. त्यामुळे त्यांना नवी ओळख मिळेल. या योजनेंतर्गत देशात घडणाऱ्या भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यात येणार आहे. हे पहिल्यांदा २२ जानेवारी २०१५ रोजी लाँच करण्यात आले होते. ज्याद्वारे सर्वाना सांगण्यात आले की, कन्येचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा भविष्याचा पाया आहे. देशाच्या मुली शिक्षित होतील तरच ती अनेकांना शिक्षण देऊ शकेल.

मुलांप्रमाणेच मुलींनाही या जगात जन्म घेण्याचा सामान अधिकार आहे, म्हणूनच देशाचे सरकार मुलींना वाचवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी वेळोवेळी विविध योजना राबवत असते.या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सुरक्षेची तर काळजी घेतली जाईलच शिवाय मुलींनाही उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना | Beti bachao beti padhao Highlights

योजनेचे नावबेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
योजना कुणी सुरु केलीभारत सरकार
लाभार्थीमहिला
उद्दिष्टलिंग गुणोत्तर सुधारणे
अधिकृत संकेतस्थळhttps://wcd.nic.in/bbbp-schemes

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे फायदे | Benefits of Beti bachao beti padhao scheme

  • बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत जर तुम्ही मुलीचे खाते उघडले तर निश्चित तुम्हाला मुलीच्या उच्च शैक्षणिक खर्चासाठी, तसेच मुलीच्या लग्नासाठी, मुलीच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी या पैशांचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.
  • या योजनेअंतर्गत खात्यात किमान 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहे. तसेच ही रक्कम पुढील 14 वर्षांसाठी जमा करू शकतात.
  • खात्यात जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत प्रति वर्ष रक्कम जमा करू शकता.
  • या बचत खात्यावर उच्च-व्याज दर देखील मिळतो.
  • या योजनेअंतर्गत पालक त्यांची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 50% रक्कम काढू शकतात. तसेच ती 21 वर्षांची झाल्यावर ते उर्वरित रक्कम सुद्धा काढू शकतात.
  • या योजनेंतर्गत तुम्ही जमा केलेली रक्कम तसेच शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत तुम्हाला देण्यात येईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे उद्दिष्ट | Beti bachao beti padhao scheme

  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लिंग गुणोत्तर सुधारणे आणि मुलींच्या पालकांना त्यांच्या मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
  • देशातील नागरिकांचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत.
  • ही योजना भ्रूणहत्या रोखण्यासाठीही प्रभावी ठरेल. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून मुलींचे भविष्यही उज्ज्वल होऊन त्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
  • मुली आणि मुलांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचीही खात्री होईल.
  • मुली जितक्या जास्त शिक्षित होतील तितक्या त्या त्यांच्या पद्धतीने समजून घेऊन त्याचा सामना करू शकतील. या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या कारणासाठी सुरू करण्यात आली की जेणेकरून समाजात मुलींचे खरे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ चे वैशिष्ट्ये | Features of Beti Bachao Beti Padhao

  • बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. ज्यामध्ये भारतातील प्रत्येक मुलीला लाभ मिळेल.
  • या योजनेद्वारे मुलींचे अस्तित्व, सुरक्षितता आणि शिक्षणाची खात्री करण्यात आली आहे.
  • या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, या माध्यमातून देशातील वाढत्या भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होणार आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये लाभ म्हणून सरकारकडून मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
  • बेटी बचाओ बेटी पढाओच्या माध्यमातून आपल्या समाजातील मुलींबद्दलचा वाईट दृष्टीकोनही बदलेल.
  • केंद्र सरकारने 2015 पासून 100 जिल्ह्यांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण व्हावे यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.
  • जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतील पात्रता | Eligibility of beti bachao beti padhao scheme

  • या योजनेसाठी तुमचे भारतीय असणे अनिवार्य आहे. तरच तुम्हाला त्यासाठी पात्रता मिळेल.
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलीचे वय 1 वर्ष ते 10 वर्षे असावे. तेथे तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी पालकांना त्यांच्या मुलाचे बँक खाते उघडावे लागेल.
  • मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे | Documents for beti bachao beti padhao scheme

जर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्यासाठी योजनेशी संबंधित कागदपत्रांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे अर्ज करू शकाल. योजनेशी संबंधित कागदपत्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • मुलीचा जन्म दाखला
  • मुलीचे आधार कार्ड
  • पालकांचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा- ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, वीज बिल इ.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • अधिकृत बँकेचे खाते

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी अर्ज कसा करावा?

बेटी बचाओ बेटी पढाओ ऑफलाईन अर्ज प्रक्रिया | Offline application for Beti bachao beti padhao scheme

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना खाजगी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
  • योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत घ्यावी.
  • आता तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित योजनेचा अर्ज घेऊन, फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सर्व कागपत्रांची झेरॉक्स अर्जासह जोडून बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्याकडून अर्जाची पोचपावती घ्यावी.
  • अशाप्रकारे तुमची बेटी पढाओ बेटी बचाओ अंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

बेटी बचाओ बेटी पढाओ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Online application for beti bachao beti padhao scheme

  • सर्व प्रथम तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर मुख्यपृष्ठ समोर उघडेल यथे महिला सक्षमीकरण योजनेचा पर्याय दिसेल.या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल.या पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नवीन पेजवर तुम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओशी संबंधित सर्व नवीन मोहिमा आणि योजनांची तपशीलवार माहिती मिळेल ती वाचा आणि नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रियेचे अनुसरण करा.
  • येथे तुम्हाला संपूर्ण जाहिरात मिळेल. ही जाहिरात हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी तुम्ही या योजनेचा पूर्ण अभ्यास करून ऑनलाईन पद्धतीने लाभ घेऊ शकता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles