Tuesday, October 8, 2024

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना |PM Mudra Loan Scheme

- Advertisement -

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) ही एक अशी योजना आहे की ज्या अंतर्गत नागरिकांच्या गरजा किंवा व्यवसायाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे लोन पुरवले जाते. या योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना कोणत्याही हमीशिवाय 10 लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी पुरवले जाते. केंद्र सरकारने ही योजना नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आखण्यात आलेल्या असून यातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कर्जावर कोणत्याही प्रकारची प्रोसिजन शुल्क आकारले जाणार नाहीत त्यानंतर तुम्हाला सरकारकडून मुद्रा कार्ड दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना उद्दिष्ट | PM Mudra Loan Scheme Objective

  • आज भारत विकसनशील देश जरी असला तरी जलद गतीने विकसित देश बनण्याकडे मार्गाक्रमण करत आहे. अशातच देशातील लहानमोठे उद्योग त्यासाठी हातभार लावताना दिसतात.
  • म्हणूनच केंद्र सरकारने अशा लहानमोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन (PMMY) योजनेअंतर्गत, लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा जर त्यांचा already व्यवसाय असेल तर तो grow करण्यासाठी देखील लाभार्थी कर्ज मिळवू शकतात.
  • या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, देशातील अधिकाधिक युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे आहे. जेणेकरून देशातील बेरोजगारी कमी होईल त्याचबरोबर देशाची प्रगतीही झपाट्याने होईल.
योजनेचे नावप्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
यांच्याव्दारे सुरुवातकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात8 एप्रिल 2015
योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते₹50000 ते ₹1000000/-
अधिकृत वेबसाइटhttps://www.mudra.org.in/
टोल फ्री क्रमांक (National)1800 180 11 11 / 1800 11 0001
टोल फ्री क्रमांक (Maharashtra)18001022636
मुद्रा लोन अर्ज / Application Formप्रधान मंत्री मुद्रा लोन अर्जाचा फॉर्म

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे  | PM Mudra Loan Scheme Benefits

  • मुद्रा कर्ज योजना (PMMY) उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
  • मुद्रा कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नसते. याव्यतिरिक्त, मुद्रा कर्जात (mudra loan) कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • पीएमएमवाय अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून, कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात. मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
  • मुद्रा योजनेंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
  • कर्ज घेणाऱ्या लाभार्थीला मुद्रा कार्ड मिळते, ज्याच्या मदतीने व्यावसायिक गरजांवर खर्च करता येतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रकार |PM Mudra Loan Scheme Types

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) ३ प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

मुद्रा कर्जाचे प्रकारकर्ज वाटपाची रक्कम
शिशू₹ 50000 पर्यंत
किशोर₹ 50000 ते ₹ 500000 पर्यंत
तरुण₹ 500000 ते ₹ 1000000 पर्यंत

मुद्रा लोन घेण्यासाठी पात्रता | Eligibility for PM Mudra Loan Scheme

  • धान मंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात खूप लोकप्रिय आहे. मुद्रा कर्ज सर्व प्रकारच्या छोट्या व्यावसायिकांना दिले जाते. तुम्ही कोणताही छोटा, मध्यम किंवा मोठा व्यवसाय करत असाल तर तुम्ही प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहात.
  • जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा तुमचा आधीचा जुना व्यवसाय वाढवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही या योजनेद्वारे सहज कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही लहान व्यवसाय चालवत असाल तर तुम्हाला शिशु योजनेअंतर्गत कर्ज दिले जाईल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.
  • प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. तुमचे आधार कार्ड आणि इतर ओळखीचा पुरावा सोबत ठेवा. तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती देखील विचारली जाऊ शकते. तुमचा CIBIL स्कोर देखील चेक केला जाईल. CIBIL स्कोर योग्य असल्यास मुद्रा कर्ज सहज उपलब्ध होईल.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना कागदपत्रे | PM Mudra Loan Scheme Documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अर्जदाराचा कायमचा पत्ता
  • व्यवसाय पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
  • मागील तीन वर्षांचे Balance Sheet
  • इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

मुद्रा लोन साठी काय करावे लागेल? | What needs to be done for Mudra Loan?

मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार online आणि offline दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

Online अर्ज करण्याची प्रक्रिया | Online Process

  1. सर्वप्रथम कोणत्याही सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून Mudra Loan अर्ज डाउनलोड करा.
  2. आता हा download केलेला अर्ज व्यवस्तीत भरून घ्या सोबतच आवश्यक कागदपत्रे जोडा.
  3. reference ID  किंवा क्रमांक मिळविण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
  4. कर्जाची औपचारिकता पुढे नेण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. त्यामुळे संदर्भ आयडी क्रमांक तुमच्याजवळ जपून ठेवा.
  5. कर्जाचा अर्ज आणि कागदपत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, कर्जाची रक्कम मंजूर केली जाईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात वितरित केली जाईल.

कर्जदार MUDRA कर्जासाठी उद्यम मित्र पोर्टलवर देखील (www.udyamimitra.in) ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

Offline अर्ज करण्याची प्रक्रिया | Offline Process

  1. PMMY अंतर्गत MUDRA कर्ज ऑफर करण्यासाठी पात्र असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या
  2. बँकेच्या काउंटरवर सर्व आवश्यक कागदपत्रांसह कर्ज अर्ज भरा आणि सबमिट करा
  3. बँकेसोबत कर्जाची पुढील सर्व औपचारिकता आणि प्रक्रिया पूर्ण करा
  4. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, अर्ज मंजूर केला जाईल
  5. कर्ज मंजूरीनंतर, इच्छित रक्कम निर्दिष्ट कामाच्या दिवसांत नमूद केलेल्या बँक खात्यात वितरित केली जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles