kolhapur loksabha आज शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकलंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गटबाजीचे राजकारण सुरू झाले आहे. आज उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहिले. त्यांनी परवा रात्रभर अनेक गुप्त मीटिंग करण्यात आल्याचे समजत. आज प्रकाश आवडेही उपस्थित असल्याने महायुतीने मोठी तयारी सुरू केल्याची दिसून येते.
बंटी पाटलांवर शाहू महाराज अवलंबून? | kolhapur loksabha
कोणतीही निवडणूक असो त्यासाठी स्वतची आणि पक्षाची यंत्रणा लागते. सध्या शाहू महाराजांकडे तशी कोणतीही यंत्रणा नसल्याचे समजते. प्रचार यंत्रणेची संपूर्ण धुरा बंटी पाटील हे सांभाळत आहे. पण आता त्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. कारण कोल्हापूर शहरात अधिक मते पडतील अस कॉँग्रेस च्या अनेक नेत्याना वाटत होत. पण आज खासदार धनंजय महाडीक यांनी मोठा धक्का विरोधकांना दिला आहे.
आज पत्रकारांशी बोलताना धनंजय महाडीक म्हणाले की जवळपास 105 नगरसेवकांनी नरेंद्र मोदी यांना साथ द्यायची ठरवल आहे. त्यासाठी त्यांनी संजय मंडलिक यांना पाठिंबाही दिला असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर 12 माजी महापौर यांनी पण मंडलिक यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का कॉँग्रेसचे शाहू महाराजांना बसला असल्याची चर्चा लोकांच्या मध्ये आहे. कॉँग्रेसचे नगरसेवकही लवकरच पाठिंबा देतील असेही नाना कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे कोल्हापुकर पुन्हा एकदा राजघराण्याला नाकारतील का हे येणारी वेळच सांगेल.