कोल्हापूर लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठींबा मिळत आहे . अनेकजण विकासाच्या बाजूने विचार करताना दिसत आहेत. विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळेल असं चित्र आहे.
आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचारफेरी काढली .सकाळी ९ वाजता वळीवडे गावातून सुरु झालेल्या या प्रचारफेरीला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला . वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी हलसवडे या गावांना भेटी देत संजय मंडलिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांचे दुपारच्या सुमारास नेर्ली गावामध्ये आगमन झाले . यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
वारसा नको,विकासावर बोलूया मंडलिकांचे महाराजांना थेट चर्चेच आमंत्रण |kolhapur loksabha
दरम्यान नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात पुजारी यांनी सतेज पाटील गटाला सोडचिट्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पुजारी यांनी सांगितले.
गावामध्ये केंद्र सरकारचा आलेला निधी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रकार सतेज पाटील यांनी केला हे आपल्याला पटलं नाही असे मत पुजारी यांनी व्यक्त केले. माजी आमदार अमल महाडिक यांच्या विचारांनी प्रभावित होवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पुजारी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांना गावातून मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. संजय मंडलिक यांनी बोलताना सतेज पाटील यांचा खरा चेहरा आता उघड होत असून लोक त्यांना सोडून चालले आहेत अशी टीका केली. गावामध्ये विकासगंगा आणण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केली.
माजी आमदार अमल महाडिक यांनी मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन केले. यावेळी तानाजी पाटील, अनिल पंढरे, जितेंद्र संकपाळ,सदाशिव चौगुले, कृष्णात सुतार , भाऊसो पाटील ,मकरंद चौगुले, विक्रम पाटील, पोमान्ना पुजारी,विष्णू पुजारी,प्रकाश मगदूम, प्रदीप चौगुले, धनाजी नलवडे, अनिल मांडरेकर, योगेश मांडरेकर , अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.