Saturday, May 18, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्याला बळ देण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा -राजेश क्षीरसागर

- Advertisement -

कोल्हापूर दि.२५ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जनहिताचे काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधी मध्ये सुख-दुःखाच्या प्रत्येक घटनेमध्ये मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे कुटुंबांप्रमाणे सामील झाले आहेत. यासह राज्यातील जनतेला न्याय मिळून नागरिक सुखी समाधानी व्हावेत यासाठी विविध योजना, शासन आपल्या दारी, अनेक लोकहिताचे निर्णय घेवून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.

मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची जनतेस न्याय देण्याकरिता असणारी अहोरात्र कामाची कार्यपद्धती आम्हा लोकप्रतिनिधींना उर्जा देणारी आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या लोकहिताच्या कार्यालया बळ देण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सदर बाजार, विचारेमाळ परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेस परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

परिसरातील महिलांनी जागोजागी औक्षण ओवाळून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यानुसार देश प्रगती पथावर काम करत आहे. देशात महिला, शेतकरी, व्यापारी, कामगार, युवा वर्ग आदी सर्वच घटकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात शिवसेना – भाजप युती सरकार यशस्वी ठरत आहे. त्याच पद्धतीने राज्यातही अनेक प्रकल्पांद्वारे विकासाची गंगोत्री महायुती सरकारने वाहती केली आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोणतीही जाहिरात बाजी न करता मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाकडून प्रा.संजय मंडलिक यांनी मंजूर केलेला निधी सर्वसामान्यांच्या हिताचा कामासाठी वापरला आहे. ही निवडणूक महायुती विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून, कोल्हापूर जिल्ह्यास प्राप्त झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीमुळे मतदार महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी श्री.राजेश क्षीरसागर यांनी सदरबाजार, विचारेमाळ परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक संजय निकम, संजय जामदाडे, उपशहरप्रमुख राहुल चव्हाण, तन्वीर बेपारी, शाम जाधव, युवा सेना शहर सरचिटणीस विपुल भंडारे, स्वरूपा घाडगे, विद्या दाभाडे, लक्ष्मी हेगडे, कल्पना धोंगडे, लक्ष्मी सूर्यवंशी, शहाजात बेपारी, यासीन बेपारी, राजू बेपारी, अब्दुल बेपारी, बाबासाहेब सूर्यवंशी, प्रेम हेगडे, तौसीफ जांभारकर, हुजेफा शेख, अर्जुन मोहिते, ताहीर बेपारी, अमोल साळोखे, विजय साळोखे यांच्यासह भागातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles