मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील मोठा बदल
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतो. मात्र, आता या योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून 9 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यामुळे सरकारला 945 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.
5 लाख महिलांची आधीच काढणी, आणखी 4 लाख अपात्र
डिसेंबर 2023 मध्ये 2.46 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटींवर घसरला. याचा अर्थ, 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले.
याशिवाय, या महिन्यात आणखी 4 लाख महिलांना योजनेतून वगळले जाईल, असे सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एकूण 9 लाख महिलांना लाभ मिळणार नाही.
महिलांना अपात्र का ठरवले?
योजनेच्या तपासणीत खूप मोठे गैरप्रकार समोर आले. काही महिलांना नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहिण योजना दोन्हीचा लाभ मिळत होता. त्यामुळे आता अशा महिलांना फक्त नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये आणि लाडकी बहिण योजनेतून फक्त 500 रुपये मिळतील.
याशिवाय, चार चाकी वाहन असलेल्या महिला, दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या महिला आणि इतर सरकारी योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या महिलांना देखील अपात्र करण्यात आले.
योजनेत नवीन नियम लागू होणार!
राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी नवीन नियम लागू करणार आहे. यामध्ये:
✔️ प्रत्येक वर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि जीवन प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
✔️ वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना योजनेतून वगळले जाईल.
✔️ आधार कार्ड लिंक नसलेल्या महिलांना देखील अपात्र मानले जाईल.
✔️ बँक खात्यात लाभ घेतलेल्या पण अर्जावर चुकीची माहिती असलेल्या महिलांची पुन्हा तपासणी होईल.
PM KISAN | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढून झाली ९००० रुपये
पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना | पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे
8वी हप्ता कधी मिळेल?
सरकारने पात्र महिलांना फेब्रुवारी 2025 महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने 3490 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, 21 फेब्रुवारीपासून डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातील.
सरकारच्या निर्णयावर महिलांची प्रतिक्रिया
योजना बंद झाल्यामुळे लाखो महिलांवर परिणाम होणार आहे. आर्थिक मदतीला गती मिळण्यासाठी सरकारने अधिक पारदर्शकता आणावी, अशी अनेक महिलांची मागणी आहे. दुसरीकडे, सरकारच्या मते हा निर्णय गरजू महिलांना मदत करण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना हटवण्यासाठी आवश्यक होता.
तुम्हाला हा बदल योग्य वाटतो का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा! 👇