चर्चेला उधाण, अमल महाडिकांनी मारले मैदान!

- Advertisement -

कोल्हापूर : येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेगळ्याच वळणावर पोहचली असून काल दिवसभर संध्याकाळी बिंदू चौकात काय होईल म्हणून उत्सुकता शिगेला गेली होती. कोल्हापूरसह राज्याचे लक्ष बिंदू चौकाकडे लक्ष लागून राहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त स्मारकाला भेट देण्यासाठी अनुयायांची प्रचंड गर्दी होती. यामध्ये राजाराम निवडणुकीतील सत्ताधारी आणि विरोधी गटाचे उमेदवार समोरासमोर येण्याचे जाहीर सभांमधून आवाहन- प्रतिआवाहन (Amal Mahadik Vs Bunty Patil) देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाची मात्र धावपळ उडाली.

महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली २८ वर्षे निर्विवाद सत्ता राहिली असून महाडिक गटाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बंटी पाटील यांनी तगडे आवाहन दिल्याचे बोलले जात आहे. विरोधी गटाकडून लाटवडे याठिकाणी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी बिंदू चौकात येण्याचे आवाहन दिले होते. याची दखल घेत माजी आमदार अमल महाडिक यांनी आवाहन स्वीकारत “मी येतोय. मी राजाराम कारखान्यावर बोलायला तयार आहे. आपण डी. वाय. पाटील कारखान्यावर बोलावे,” अशी घोषणा केली. यामुळे दोन्ही गटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पाटील हे आक्रमक तर अमल महाडिक हे संयमी भूमिकांसाठी ओळखले जातात. यावेळी मात्र अमल महाडिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. साडेसात वाजता बिंदू चौकात येऊन माध्यमांशी बोलताना “मी आलोय, आपणही डी. वाय. पाटील चे ठराव आणि कागदपत्रे घेऊन यावे.” असे आवाहन केले. परंतू आमदार बंटी पाटील हे आले नाहीत. महाडिक यांच्या समर्थकांनी ‘अमल आले, बंटी भ्याले’ अशा घोषणा दिल्या. रात्री साडे आठच्या सुमारास आमदार ऋतुराज पाटील हे बिंदू चौकात आले होते. पाटील गटाकडून देखील घोषणाबाजी करण्यात आली. बंटी पाटील हे मनोरुग्ण पाटील आहेत – धनंजय महाडिक

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आवाहन देऊन देखील अनुपस्थित राहिल्याने महाडिक गटाकडून समाजमाध्यमांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मैदानात प्रत्यक्ष आलेच नाहीत, पुतण्याला पाठवले ते देखील वेळेत आले नाहीत. यावरून प्रचंड टीका होत असून ‘महाडिक आले, डी. वाय. वाले भ्याले’ अशा आशयाच्या पोस्टचा सोशल मिडियावर वळीवासह भडिमार सुरू होता. महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रथमच माजी आमदार अमल महाडिक यांचा आक्रमक पवित्रा पहिला. डी. वाय. पाटील कारखान्यावर अबोला, अन बिंदू चौकातील अनुपस्थिती यावरून कुस्तीचे आवाहन देणारे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना चीत करून माजी आमदार अमल महाडिक यांनी मैदान मारले अशा चर्चेला उधाण आले असून विरोधी गटाने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles