भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत अनोखा उपक्रम “पुस्तकांवर बोलू काही” 

0 10

मोबाईलच्या या दुनियेत पुस्तकाचे वाचन मागे मागे पडत चालले आहे. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. विचारांची देवाणघेवाणच बंद होत चालली आहे. यामुळे लोकांच्या मध्ये संवादही नीट होताना दिसत नाही. पुस्तक माणसाला हुशार बनवत. त्यामुळे असाच एक अनोखा उपक्रम भालचंद्र चिकोडे ग्रंथालया मार्फत घेण्यात येत आहे. “हरवत चाललेला संवाद, पुन्हा सुरू करणारा उपक्रम”

कला, कौशल्य, इतिहास, तंत्रज्ञान अशा विविध माहितीचा खजिना एकांकडून दुसरीकडे पोहोचवण्याचे साधन म्हणजे पुस्तक. तरीही हे पुस्तक सध्या नष्ट होताना किंवा लुप्त होताना दिसून येत आहे. हाताच्या बोटावर मिळणारी माहिती ती जाणून घ्यायची उत्खनता, वृत्ती, काही न मिळवायची इच्छा व त्यातील आर्थिक गोष्टी या सर्वांमुळे कमी होत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व वाढवण्यासाठी केलेला हा अनोखा उपक्रम आहे. घडून चाललेल्या प्रत्येक पिढीला येणारी नवीन पिढी बिघडवत चालली आहे असे वाटते, तरी आत्ताच्या नव्या पिढीला घडत चाललो आहे असे वाटते. 

- Advertisement -

भालचंद्र चिकोडे ग्रंथालया मार्फत प्रत्येक महिनीच्या शेवटच्या शनिवारी सायंकाळी 5 ते 6 यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या महिन्यातील पाहिले संवादपुष्प आहेत प्रसिद्ध पत्रकार सुधाकर काशीद. “कोल्हापूरच्या पाऊलखुणा” हे पुस्तक कसे लिहिले व पत्रकारितेत काय अनुभव आले? हे कथन करणार आहेत.

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल भालचंद्र चिकोडे यांच्या मार्फत आपणा सर्वांना यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.