बनावट कागदपत्र धारकांवर कार्यवाही होणार

0 5

- Advertisement -

पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षकभरतीमध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांची कागदपत्र पडताळणी करुन चौकशी व्हावी यासाठी सामान्य अभियोग्यता धारक संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे सरांची भेट घेतली.

PM Kisan Status: Check Your Farmer’s Scheme Status Online

2023 मध्ये शिक्षकभरतीसाठी राज्यशासनाने TAIT परीक्षा घेतली. भरतीप्रक्रियेमध्ये समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बरेच अभियोग्यता धारक बनावट प्रमाणपत्र सादर करत आहेत. म्हणून कागदपत्र पडताळणीच्या वेळी भूकंपग्रस्त, प्रकल्पगस्त, धरणग्रस्त, अपंग, दिव्यांग अश्या अनेक बनावट सर्टिफिकेटची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी आढळलेल्या उमेदवारांना शास्ती म्हणून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्थातच केंद्र शासन व राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात यावा. अशी मागणी केली त्यावर कारवाई करूच अशी ग्वाही दिली.

- Advertisement -

समांतर आरक्षणाचा लाभ बनावट कागदपत्रे काढून शिक्षक भरतीत एन्ट्री करत असतील तर त्यावर योग्य ती कार्यवाही करू

– मा.सुरज मांढरे, शिक्षण आयुक्त पुणे

“शिक्षकभरतीमधील भ्रष्टाचारामुळे आज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला कलंक लागत आहे. कुप्रसिद TET बोगस घोटाळा आपण जाणत आहात. त्यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्यावर अन्याय होतोय.म्हणून समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या बोगस उमेदवारांना बाहेर काढावे”

प्रा बालुशा माने, अध्यक्ष सामान्य अभियोग्यता धारक संघर्ष समिती

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.