Monday, March 20, 2023
No menu items!
Homeआरोग्यCOVID-19| पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीनंतर कोरोनानं अख्ख कुटुंबच उद्ध्वस्त केलं

COVID-19| पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीनंतर कोरोनानं अख्ख कुटुंबच उद्ध्वस्त केलं

पंढरपूर मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लोकांच्या अंगलट आली आहे.

पंढरपूर मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लोकांच्या अंगलट आली आहे. निवडणूक संपताच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. आता हॉस्पिटलमध्ये रेमडेसीवीर नाही ना बेड, ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि अनेक मृत्यु देह स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी जातात तिथे सुद्धा मोठ्या रांगा लागल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निवडणूक आयोगाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त होत राहिलंय. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संतापही व्यक्त केला. या निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. निवडणुकीनंतर आता ही भीती सत्यात उतरलीय.

पंढरपूर-मंगळवेढामध्ये वाढलेल्या कोरोनाला जबाबदार कोण ?

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात रोज कोरोना बाधितांचे आकडे बेसुमार वाढत आहेत. यात रोज अनेकांचे जीव जात आहेत. कोरोनाचे नवे रुग्ण दोन्ही तालुक्यात वाढत असताना सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक कर्तव्यावर गेलेल्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाली. इतकंच नाही तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही दगावल्या. (After the Pandharpur-Mangalvedha election, Corona destroyed the entire family).

येथील नागरिकांना ही निवडणूक भलतीच महागात पडली आहे. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता निवडणूक कर्तव्य बजावलेल्या एका शिक्षकासह त्यांच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या निवडणुकीत नेमणूक झालेल्या शिक्षकासह संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्ग झाला. यात या शिक्षकासह त्यांचे वडील, आई आणि मावशीलाही जीव गमवावा लागलाय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय (After the Pandharpur-Mangalvedha election, Corona destroyed the entire family).

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular