कॅबिनेट बैठकीकडे सर्वांची नजर | 1 जूननंतर लॉकडाऊनचं काय होईल…

Live Janmat

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं आहे. सध्याचं लॉकडाऊन 16 मे ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. सध्या राज्यातील नागरिकांना एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे, ‘1 जूननंतर लॉकडाऊनचं काय होणार?’ (All eyes on cabinet meeting | What will happen to the lockdown after June 1st)

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्याही घटल्याचं दिसून येतं. त्यामुळे येत्या 1 जूननंतर लॉकडाऊन कायम राहणार किंवा निर्बंधांमध्ये शिथीलता मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर राज्यातील सर्व नागरिकांची नजर आहे.

राज्यातील लॉकडाऊन कायम राहील किंवा नाही, याबाबत राज्य सरकारमधील कोणत्याच नेत्याने अद्याप स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी याबाबत सावध भूमिका घेणंच पसंत केलं. परिस्थिती पाहून मगच निर्णय घेण्यात येईल, असाच सूर प्रत्येकाच्या तोंडी पाहायला मिळतो. मात्र हे सांगत असताना कोरोना स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर लॉकडाऊन महत्त्वाचं ठरेल, हे सांगायला नेते विसरत नाहीत.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com