अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करा

0 0

- Advertisement -

गेले काही महीने विविध कारणामुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. पण आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेले दोन वर्ष विद्यार्थी एकाच परीक्षेचा अभ्यास करत आहेत. त्यांना परीक्षा कधी होणार हेही अजून माहिती नाहीत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यसेवेची मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा यांची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य नियोजन ही करता येत नाही.

सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात सर्व सुरळीत असताना परीक्षाची तारीख जाहीर न करणे हे अत्यंत चुकीचे आहे. लवकरात लवकर तारीख जाहीर करून परीक्षा घ्यावी
-राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती, महाराष्ट्र 
https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1407929615570456576?s=20

तसेच इतरही सरळसेवा परीक्षांबाबत कोणतेही नियोजन अजूनही दिसत नाही. विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे की परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी, जेणेकरून आम्हाला अभ्यासाचे नियोजन करता येईल.सध्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात येऊन राहावे लागत आहे, त्यांचा महिन्याचा खर्च कमीत कमी 6000 ते 7000 रुपये असतो. या कोरोंनाच्या काळामध्ये सामान्य घरातील लोकांची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असून एक एक दिवस ढकलणे आता अवघड होऊन बसले आहे. ज्या लोकांचे हातावले पोट आहेत त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारने या सर्वांचा गांभीर्याने विचार करून परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

- Advertisement -

https://twitter.com/MHstudentsVoice/status/1407937693317615625?s=20
या सर्वांमध्ये विद्यार्थिनींचे प्रश्न लक्ष वेधणारे आहेत. घरातून विद्यार्थिनींना आता अभ्यास बंद कर आणि लग्न करून टाक असे सल्ले दिले जाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार काय असे वाटू लागले आहे. गेल्या वर्षभरात चार ते पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केलेल्या आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, रिजल्ट वेळेवर लागत नाहीत, विद्यार्थ्यांना जॉइनिंग ही वेळेवर मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. विविध संघटना आता आंदोलनाची तयारी करत आहेत. पण विद्यार्थ्यांची आता रस्त्यावर उतरण्याची मानसिकताही राहिलेली नाही कारण प्रत्येक वेळी आंदोलन करुन त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांनाच बसलेला आहे. राजकीय लोक विद्यार्थ्यांचा फायदा घेतात. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. लवकरात लवकर परीक्षेची तारीख जाहीर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करून परीक्षा देता येईल.  
- विश्वंभर भोपळे (मराठा विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र राज्य)

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.