Friday, October 4, 2024

विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये दोन टप्यात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे|

- Advertisement -

Assembly elections in November Eknath Shinde: महारष्ट्रातील विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून पक्षीय मोर्चेबांधणी सुरु झाली असून विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते दावे करू लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून चांगलेच घमासान होण्याची शक्यात आहे. दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे संकेत दिले आहेत.विधानसभा निवडणुका 12 नोव्हेंबरपर्यंत दोन टप्यात होवू शकतात,असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्यात :

राज्यातील मागील अनेक वर्षे एकाच टप्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत.सध्या राज्यात आंदोलनाचा जोर वाढला आहे. 1999 नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका एकापेक्षा अधिक टप्प्यात होण्याची शक्यता आहे. या अगोदर 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक दोन टप्यात झाली होती आणि त्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट झाला होता.

काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होतील अशी चर्चा सुरू होती. परंतु सध्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते. विधानसभा निवडणुका एका टप्प्यात नसून दोन टप्प्यात होतील असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर का याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मतदान झाले, मतदार यादीतील मतदारांचे नावे गहाळ झाल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मतदार यादीतील चुका दुरुस्ती करत आहे. दुसरे कारण म्हणजे राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी झालेले आंदोलने आणि उपोषणे यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.राज्यात हा प्रभाव प्रामुख्याने मराठवाड्यात दिसून आला. म्हणून विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles