टाकळी सिकंदर:- येथील भीमा(Bhima’s) सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांनी मोहोळ तालुक्यातील सर्वाधिक २६०० रुपये प्रति टन ऊसाला दर जाहीर केला. एकीकडे उसाच्या दरावरून शेतकरी संघटना आक्रमक असताना समाधानकारक दर देऊन महाडिक यांनी सभासद – शेतकरी यांना सुखद धक्काच दिला आहे. यामुळे विविध शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडून सत्कार व कौतुक होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांचा शेतकरी हिताचा धडा इतर कारखानदार कधी गिरवणार असा खडा सवाल ऊस उत्पादक शेतकरी विचारत आहेत.