Tuesday, September 10, 2024

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचा महायुतीला पाठींबा.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहायाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात राजकारणाचे विद्यापीठ म्हणून कागल विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे हाच मतदारसंघ आता पुन्हा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी कागल विधानसभा (kagal Assembly) मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना एका जाहीर सभेत आगामी विधानसभेसाठी पाठिंबा जाहीर केला यानंतर सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा कागलकडे वळल्या. माजी आमदार संजय घाटगे हे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते आहेत तर पालकमंत्री  हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे महायुतीचे नेते आहेत या दोघांमध्ये पारंपारिक राजकीय वैर असल्याचे संपूर्ण जिल्ह्याने पहिले आहे.

मुश्रीफांना पाठींबा दिल्याने कारवाई होणार : संजय पवार

कागल विधानसभा (kagal Assembly) मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) संभाव्य उमेदवार  हे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आहेत. त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने माजी आमदार संजय घाटगे यांच्यावर कारवाई होऊ शकते. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ  यांच्या पाठीशी राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. घाटगे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्या संदर्भात घाटगे यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे संजय पवार यांनी स्पष्ट केले आहे.


आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही लढाई आरपारची मानली जाते त्यामुळे संजयबाबा घाटगे (Sanjay Ghatge) यांनी असा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे त्यांना कधीच माफ करू शकत नाहीत उद्धव ठाकरे हे लवकरच त्याबाबत निर्णय घेतील पक्षविरोधी कोणीही काम करू दे मग तो आमदार असो वा खासदार असो त्यांच्यावर कारवाई केली जाते त्यामुळे उद्धव ठाकरे हे कारवाई बाबत निर्णय घेतील असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक लढवण्यास घाटगे इच्छुक होते.


लोकसभा निवडणुकीत संजय घाटगे (Sanjay Ghatge) हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते त्यांनी उमेदवारीची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील केली होती मात्र विधानसभा निवडणुकीसाठी  त्यांनी उमेदवारीसाठी कोणतीही मागणी केलेली नाही. कागल विधानसभा (kagal Assembly) मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट प्रबळ आणि भक्कम उमेदवार देईल या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा कायम असणार आहे. मात्र घाटगे यांनी त्यांचा निर्णय स्वतःच घेतला आहे त्यांनी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत कोणतीच चर्चा केलेली नाही असे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles