Tuesday, April 23, 2024

मोठी बातमी! पोलीस भरती घोटाळ्यातील चौकशी करण्यासाठी गेले असता मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला

- Advertisement -

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलीस भरती प्रकारात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या या पथकावर 30 ते 32 लोकांच्या जमावाने लाठ्या-काठ्यांसह कुऱ्हाडीने हल्ला चढवल्याने खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस घोटाळ्यातील संशयित आरोपींना देखील जमावाने पळवून लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद चितळकर यांनी वैजापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सद्या ते गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत आहे. दरम्यान पोलीस भरती प्रकरणाचा तपास करत असताना ते आपल्या पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे जनकसिंह सिसोदे आणि संतोष गुसिंगे या दोन संशयित आरोपींच्या चौकशीसाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस देखील होते.

Talathi bharti 2023 online form date ; syllabus

नवीन मेगाभरती बाबत संभ्रम

शासकीय नोकरभरती मध्ये वारंवार होणारे घोटाळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वेळोवेळी उघडकीस आणले होते. मुंबई पोलीस भरती मध्येही समितीने योग्य ते पुरावे मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा केला होता. पोलीस भरती घोटाळ्याची सखोल चौकशी चालू आहे. अश्यातच ही घटना घडल्यामुळे पेपर फोडणारी टोळी किती सक्रिय आहे याचा अंदाज आला असेलच.त्यामुळे नवीन होणाऱ्या जिल्हा परिषद, तलाठी भरती, नगरपरिषद भरती पारदर्शक होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान गावात गेल्यावर त्यांनी आरोपींच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करत जमाव जमा केला. तर यावेळी 30 ते 32 लोकं लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाड घेऊन जमा झाले. तसेच जमवाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली. तसेच जमावातील एकाने हातातील कुऱ्हाड घेऊन थेट पोलीस कर्मचारी विनोद चितळकर यांच्या डोक्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी वेळीच स्वतःचं बचाव करत वार चुकवल्याने मोठं अनर्थ टळला. पण याचवेळी त्यांच्या ओठाला कुऱ्हाडीचा दांडा लागला आहे.

पोलीस भरती मध्ये एक पण बोगस लागला नाही पाहिजे. यांची हिंमत रोज वाढत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर याचा तपास करावा. तलाठी भरती मध्ये सुद्धा हे पेपर फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत पण स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles