आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल. केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं.
ज्या लोकांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना पैसे देऊन लस घेता येईल. मात्र खासगी रुग्णालये 150 रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात. या किमतीवर नियंत्रण राज्य सरकारांनी ठेवावं, असं मोदी म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “जगात लसीची मागणी होत आहे. लशींच्या मागणीशी तुलना केली, तर जगात करोना लसीचं उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. मग अशा परिस्थिती जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. “आज हा निर्णय घेण्यात आला की, राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं २५ टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे.
21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार
आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती 25 टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल, येत्या दोन आठवड्यात ते लागू केलं जाईल. त्याबाबत नवी नियमावली तयार केली जाईल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार. लसनिर्मिती कंनप्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 75 टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार. आतापर्यंत देशातील अनेक नागरिकांना मोफत लस मिळाली आहे. आता १८ वर्षावरील लोकांनाही मोफत लस मिळेल.भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील, त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. लसीच्या एकूण किमतीच्या 150 रुपये जास्त सर्व्हिस चार्ज घेऊन खासगी लस घेऊ शकता.
दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत राशन
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल.
[…] मोठी बातमी| मोदी सरकार 21 जूनपासून १८ वर… […]