राज्यात नोकर भरती असो वा सरकारी बदली असो भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चालूच आहे. RFO यांच्या बदल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अचानक थांबवल्यामुळे बाकीच्या क्षेत्रात बदलीसाठी होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी होत आहे. अश्यातच राज्यातील 36 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने आयुक्तांनी एसीबीला पत्र लिहिले आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे.
मोठी बातमी! पोलीस भरती घोटाळ्यातील चौकशी करण्यासाठी गेले असता मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला
शिक्षक भरती मध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांच्यावर खुली चौकशी करण्याची मागणी एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी मागणी केली आहे. तसेच काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
Talathi bharti 2023 online form date ; syllabus
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे दर पत्रक
कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी – 1 ते 1.5 लाख रुपये , शालार्थ प्रकरणांसाठी – 80 हजार ते एक लाख रुपये
मेडिकल बिल मंजुरीसाठी – बिलाच्या रकमेच्या 5 ते 20 टक्क्यांपर्यंत
शिक्षक बदलीसाठी – 50 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत
शासकीय नोकरभरती मध्ये वारंवार होणारे घोटाळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वेळोवेळी उघडकीस आणले होते. मुंबई पोलीस भरती मध्येही समितीने योग्य ते पुरावे मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा केला होता. पोलीस भरती घोटाळ्याची सखोल चौकशी चालू आहे. अश्यातच ही घटना घडल्यामुळे पेपर फोडणारी टोळी किती सक्रिय आहे याचा अंदाज आला असेलच.त्यामुळे नवीन होणाऱ्या जिल्हा परिषद, तलाठी भरती, नगरपरिषद भरती पारदर्शक होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारी कार्यालये, पोलिस स्थानकात भ्रष्टाचार चालतोच पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो त्या शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. गेल्या काही वर्षात एसीबीने उघड केलेली प्रकरणे पाहता भ्रष्टाचाराचा हा चढता आलेख चिंता वाढवणरा आहे.