गोकुळ ही जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे मल्टिस्टेटमध्ये रुपांतर झाल्यास जिल्हा दूध संघाचा दर्जा जाईल. असे म्हणत त्यावेळी राजू शेट्टी यांनी विरोध केलेला होता.आणि आता याच अटीवर सत्ताधारी गटाला पाठिंबा दिलेला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी भेट घेतली होती. माजी खासदार महाडिक व माजी आमदार घाटगे यांनी शिरोळ येथे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बंद खोलीत काही काळ चर्चा केली होती. या चर्चेनंतर संघटनेचे प्रमुख शिलेदार सावकर मादनाईक, संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे यांच्यासमवेतही चर्चा केली. सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीने दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. यामुळे स्वाभिमानीच्या ठरावधारक मतदारांनी सत्ताधारी पॅनेलच्या मागे राहावे, अशी आग्रही मागणी केली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटना गोकुळच्या निवडणुकीत सहभागी…