शनिवार १ मे २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येतील असा आदेश राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शुक्रवारी यासंदर्भातील जारी केले आहेत.
- राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा; तसेच
- ज्युनिअर कॉलेजांना उद्या १ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
- विदर्भात तापमान अधिक असल्याने विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी
- उर्वरित महाराष्ट्रात १४ जून रोजी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल
राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. यात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, ‘शनिवार १ मे २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आल्या आहेत. सुट्टीचा कालावधी १३ जून २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा. पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात.
ताज्या बातम्यासाठी तुमचा Email Subscribe करा
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान पाहता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील.’ शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा सध्याच्या करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्ग ऑनलाइनच होणार आहेत. स्थानिक प्रशासनाने शाळांबाबच स्थानिक कोविड स्थितीनुसार निर्णय घ्यायचा आहे.