कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी भाजप आग्रही.

लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा (kolhapur-north assembly) जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोल्हापूर उत्तरमध्ये  उमेदवारासाठी चाचपणी सुरू आहे. राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे कोल्हापूर उत्तरचे लक्ष असणार आहे. कोल्हापूर लोकसभा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. भारतीय जनता पार्टी कडून मोर्चे बांधणीची सुरुवात झाली आहे. सर्वांनी आपापल्या पद्धतीने आगामी निवडणुकीसाठी फिल्डिंग लावलेली दिसून येते.

कोल्हापूर दक्षिणसह या मतदारसंघात भाजपचा दावा.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांचे नेते सक्रिय झालेले दिसून येत आहेत. मोर्चे बांधणी नेत्यांना तिकिटासाठी दबाव टाकणे. विविध सर्वे आणि ग्राउंड लेव्हल पक्ष मजबुतीसाठी केले जाणारे काम सर्वत्र दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे नुकतेच जिल्हा अधिवेशन पार पडले या अधिवेशनामध्ये बुथ बांधणी मजबूत असल्याने आपल्याला कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ मिळणार आहेच यासोबतच कोल्हापूर उत्तर, कागल, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ आणि चंदगड या जागा आपणाला मिळाव्या यासाठी मागणी केल्याचे दिसून येत.

राजेश क्षिरसागरांची भूमिका काय असणार ?

आगामी येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण सह कोल्हापूर उत्तर (kolhapur-north assembly) ही जागा भाजपाला मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते प्रयत्नशील आहेत पण या मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांचे स्वतः लक्ष असल्याचेही दिसून येते मुख्यमंत्र्याचे जवळचे सहकारी आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (rajesh kshirsagar) यांचा दावा असल्याचा दिसून येतो महायुतीमध्ये त्यांना तिकीट मिळू शकते कारण यापूर्वी दोन वेळा ते या विधानसभे मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यामध्ये अशीही चर्चा सुरू आहे की राजेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर पाठवायचे यासाठी भाजपाचे सर्व नेते प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. जर राजेश क्षीरसागर (rajesh kshirsagar) हे विधान परिषदेवर गेले तर कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो.

जिल्ह्यातील वरिष्ठ भाजप नेते राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांनी पत्रकारांशी बोलताना काही दिवसांपूर्वी सांगितले देखील होते की कोल्हापूर उत्तर (kolhapur-north assembly) ही जागा भाजप लढवेल व यासाठी पक्ष जो ठरवेल तो उमेदवार दिला जाईल. या मतदारसंघांमध्ये राहुल चिकोडे, महेश जाधव, सत्यजितनाना कदम, कृष्णराज महाडिक यांची नावे चर्चेत आहेत.

एकंदरीत कोल्हापूर उत्तर विधानसभेची चर्चा आतापासूनच रंगत आहे आगामी काळात बऱ्याच राजकीय उलाढाली जिल्ह्यात होऊ शकतात.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com