न्यायालयावर आम्हाला विश्वास आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. निवडणूक आयोग पण आता न्यायालयाच्या भूमिकेत आहे. स्पष्टपणे मागचं निवडणूक आयोगाचे कार्यपद्धती पाहिली तर ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्या बाजूने निर्णय होतो, ज्याच्याकडे बहुमत असेल तो सगळ्यात जास्त खरा आणि इमानदार पक्ष ,बहुमत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, त्यामुळे सत्याचाच विजय होणार, असे किरीट सोमय्या म्हणाले. | Eknath Shinde
महाविकास आघडीचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याचे अनेकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. याबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन होणार आणि त्या भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्टाचाराचा स्मारक ग्रीन स्ट्रीट रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याच्या कामाची सुरुवात होणार असा इशारा दिला आहे. किरीट सोमय्या आज डोंबिवलीतील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नवरात्र उत्सवात भेट देण्यासाठी आले होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी देवीची पूजा केली .