Breaking News|मविआ सरकार आपल्या वजनानेच खाली पडेल-अमित शाह

- Advertisement -

अमित शाह यांचं महाविकास आघाडी बाबत मोठ वक्तव्य…

टाइम्स नाऊ यांनी घेतलेल्या मुलाखातीमध्ये अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सत्तेबद्दल मोठ वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी म्हणजे अपवित्र आघाडी आहे. त्यामुळे ते त्यांच्या वजनानेच खाली पडेल, तोपर्यंत वाट बघू असा टोलाही यावेळी लगावला आहे. राज्यात फडणवीस ब्युरो ऑफ चौकशी आहे, ते नीट काम करेल.

शराद पवार आणि अमित शाह भेट

दरम्यान, याच मुलाखतीत शहा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीवर भाष्य करण्यास नकार दिला. शहा-पवार यांची नुकतीच भेट झाली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच भेटीचा तपशील सांगण्यास शहांनी नकार देऊन पुन्हा एकदा या भेटीचा सस्पेन्स वाढवला आहे.

follow us

ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी बरेच संकेत दिले आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles