लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच प्रचाराबरोबरच युती-आघाडी, जागावाटप यांचीही चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा सोडता येतील यावर भाजपमध्ये खल सुरू झाला आहे. एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हाच मोठा भाऊ असेल, असे स्पष्ट करीत भाजप अधिक जागा लढणार हे स्पष्ट केले होते. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सोमवारी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
गेल्या वर्षी फुटीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार यांनी विधानसभेला ९० जागा लढणार असल्याचे जाहीर केले होते. लोकसभेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला फक्त चार जागा आल्याने विधानसभेला भाजप किती जागा सोडते याबाबत उत्सुकता आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. यानुसार हरियाणा विधानसभा 4 नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.
- धनंजय महाडिक युवाशक्तीच्या पुनर्बांधणीसाठी कृष्णराज महाडिक यांचा दौरा
- Ladki Bahin Yojana Status: A Complete Guide
- Ladki Bahin Yojana Benefits and Application Process
- Ladki Bahin Yojana | नवीन वर्षात ‘या’ तारखेला बहीणींच्या खात्यात 7 वा हप्ता जमा होणार आहे; तारीख जाणून घ्या
- Top 10 indian web series That Kept Us Hooked in 2024
सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, 21 ते 26 ऑक्टोबरदरम्यान मतदानाची शक्यता आहे.