Saturday, July 27, 2024

अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, वाणिज्य इंग्रजी माध्यम व विज्ञान शाखेतील प्रवेश ऑनलाईन होणार

- Advertisement -

कोल्हापूर : येथील शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर विद्यार्थी आणि पलाख यांचे अकरावी प्रवेशासाठी लक्ष लागून राहिले. इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश सन 2023-2024 साठी इयत्ता अकरावी केंद्रिकृत प्रवेश समिती,कोल्हापूर यांनी पुढाकार घेतला आहे. वाणिज्य इंग्रजी माध्यम व विज्ञान शाखेतील प्रवेश या प्रक्रियेतून ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. तरी यासाठी विद्यार्थी आणि पालक यांनी कंबर कसली असून आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. 11th admission process

Talathi Bharti 2023 | 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश

          कोल्हापूर शहरात २ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली परंतु पहिल्या दिवशी जेमतेम विद्यार्थी यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. तरी आज पासून महाविद्यालयात लगबग वाढणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या वेबसाईटवर ऑनलाइन अर्जामधील पाहिला भाग भरायचा आहे. 11th admission process

भाग एक मध्ये विद्यार्थी यांनी नोंदणी करायची असून त्यासाठी उत्तीर्ण वर्ष, बोर्ड, बैठक क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, प्रवेश अर्ज शुल्काचा समावेश करायचा आहे. 

सूचना

  •  रजिस्ट्रेशन(नोंदणी) केले नसल्यास, नवीन नोंदणी करा या बटणावर क्लिक करा
  • आपला रजिस्टर केलेला मोबाईल नंबर लॉगइनसाठी वापरा
  • आपला पासवर्ड वापरा
  • प्रतिमेत दाखविलेले Captcha प्रविष्ट करा
  • लॉगिन पासवर्ड आणि सुरक्षा मजकूर बरोबर आल्यानंतर लॉगिनसाठी लॉग इन करा बटणावर क्लिक करा
  • जर लॉग इन करताना आपण आपला पासवर्ड विसरला असल्यास, “पासवर्ड विसरला ?” या लिंकवर क्लिक करा
  • हेल्पलाइन नंबर फक्त तांत्रिक समस्यांसाठी आहे तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान कॉल करू शकता.

 दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. याबाबत अधिक माहिती वेबसाईट वरून जाहीर करण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील २८ कनिष्ठ महाविद्यालये या प्रक्रियेत समविष्ट असून चार ते पाच फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पुर्ण होईल. 

वाणिज्य मराठी माध्यम व कला शाखा प्रवेश प्रक्रिया अशी असेल .

वाणिज्य मराठी माध्यम व कला शाखेतील प्रवेश हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट नसून यांची प्रवेश प्रक्रिया ही महाविद्यालयीन स्थरावर होणार आहे. तरी विद्यार्थी व पालक यांनी संबधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles