राजाराम मध्ये सभासदांचे ‘अमलराज’|Rajaram Chairman

Chairman 'Amal' in Rajaram
Chairman 'Amal' in Rajaram

छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आमदार अमल महाडिक विराजमान

कोलपुर : येथील बहुचर्चित राजाराम निवडणूक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाडिक गटाने एकतर्फी जिंकली. २३/० अशा फरकाने विरोधी पाटील गटाचा दारुण पराभव झाला. एकीकडे खा. धनंजय महाडिक, गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांनी आक्रमक तर माजी आमदार अमल महाडिक (Rajaram Chairman) यांनी संयमी भूमिकांनी महाडिक गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची विजयी घोडदौड कायम ठेवली. याचबरोबर शेतकरी सभासदांच्या बांधावरून भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि जिल्ह्याचे युवा नेतृत्व विश्वराज महाडिक मोठ बांधली.

राजाराम सहकारी कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन (Rajaram Chairman) पदाची धुरा आज महाडिक गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत माजी आमदार अमल महाडिक यांनी सांभाळली. तर व्हा. चेअरमनपदी नारायण चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. चेअरमन अमल महाडिक हे झाल्यामुळे राजाराम कारखान्यात आता अमल पर्वाची सुरुवात झाली असल्याचे मत महाडिक गटाने व्यक्त केले आहे. यावेळी खा. धनंजय महाडिक यांनी आपल्या स्टाइलने ऊसाचा कंडका मोडत विरोधी गटाला उपरोधीक टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here