Thursday, November 21, 2024

‘या’ मतदारसंघातून स्वाभिमानी संघटना लढविणार लाेकसभेच्या सहा जागा | Raju shetti

- Advertisement -

शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजू शेट्टी (Raju shetti) यांना महाराष्ट्रात ओळखले जाते. स्वाभिमानी संघटनेच्या (swabhimani sanghatana) माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा उभा केला आहे. नुकत्याच झालेल्या ऊस आंदोलनामुळे परत एकदा शेतकऱ्यांना शेट्टी यांचे नेतृत्व हव आहे. सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महा आघाडीत जागा वतापवरून रस्सीखेच सुरू आहे.

महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले मतदारसंघातून लढेन असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

‘या’ सहा लोकसभा स्वाभिमानी संघटना लढविणार

स्वाभिमानी संघटना ही कोल्हापूर, हातकणंगले, माढा, बुलढाणा, परभणी आणि सांगली या लोकसभेच्या जागेसाठी तयारी करत असल्याचे समजले जाते. मागील इतिहास पाहता भाजपा आणि आघाडी सोबत गेल्यामुळे शेट्टी यांना फक्त हातकणंगले मतदारसंघच सोडण्यात आला होता. त्यामुळे संघटनेतील इतर लोकसभेतील शेतकरी नेत्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. बुलढाणा मतदार संघामध्ये रविकांत तुपकर गेली १० वर्षे लोकसभेसाठी तयारी करत असल्याची त्यांनी स्वत: सांगितले आहे. त्यामुळे यावेळी ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

हातकणंगले मतदारसंघाची पार्श्वभूमी | Hatkanangle loksabha

अ.क्रवर्षउमेदवाराचे नावपक्षनिकालमते
12019धैर्यशील संभाजीराव मानेशिवसेनाविजेता5,85,776
राजू शेट्टीस्वाभिमानी पक्षउपविजेता4,89,737
22014राजू शेट्टीस्वाभिमानी पक्षविजेता6,40,428
आवाडे कल्लाप्पा बाबुरावकाँग्रेसउपविजेता4,62,618
32009शेट्टी राजू स्वाभिमानी पक्षविजेता 4,81,025
माने निवेदिता संभाजीरावराष्ट्रीय काँग्रेस पक्षउपविजेता 3,85,965


हातकणंगले मतदारसंघ Hatkanangle loksabha हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ 2008 मध्ये पुन्हा स्थापन करण्यात आला. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत: शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोल, इस्लामपूर-वाळवा आणि शिराळा. हे मतदारसंघ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेले आहेत. हा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी मतदारांच्या मिश्रणाने बनलेला आहे. या मतदारसंघात जातीय समीकरणे मोठ्या प्रमावर पाहायला मिळतात.

कोल्हापूर जिल्हा२७७ – शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
२७८ – हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
२७९ – इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
२८० – शिरोळ विधानसभा मतदारसंघ
सांगली जिल्हा२८३ – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ
२८४ – शिराळा विधानसभा मतदारसंघ

प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते

या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भाजप,कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जन सुराज्य शक्ती, प्रकाश आवाडे यांचा तारारणी पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे प्रमुख पक्ष आहेत. तसेच जातीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत भूमिका बजावतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles