Sunday, March 19, 2023
No menu items!
HomeCorona breaking | देशात कोरोनाचा विस्फोट

Corona breaking | देशात कोरोनाचा विस्फोट

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे कोरोना रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1387619116559699981?s=20

 

देशात 150 जिल्ह्यात निर्बंध शक्य

देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतींसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्यांहून अधिक आहे, अशा दीडशे जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular