कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल 1613 रुग्ण आढळले आहेत. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 789 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरांमध्ये 401 नवे रुग्णांची भर पडली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (kolhapur corona update)
कोल्हापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची कमतरता भासत आहे. काही ठिकाणी वाढीव बिल देवून सामान्य जनतेला लुटले जात आहे. (kolhapur corona update)
‘मिशन ऑक्सीजन’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून आठ तर राज्य शासनामार्फत सहा अशा एकूण चौदा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती सतेज पाटील यांनी ट्वीटरवर दिली.
- लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! ८ मार्च रोजी डबल पेमेंट –तुमचे नाव त्वरित तपासा!
- India Clinches Champions Trophy Final Spot with a Thrilling 4-Wicket Victory Over Australia
- Anveshi Jain | Top Five Web Series Must Watch Online
- Anveshi Jain: The Rising Star of Ullu Web Series
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: थरकाप उडवणारे फोटो समोर
प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी आमदार निधी खर्च करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
राज्यात प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. करोनाचा सर्व स्तरावर मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने या आधीच आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपयांपर्यंचा खर्च शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय यंत्रसामुग्री व औषधे खरेदीसाठी वारण्यास परवानगी दिली आहे. त्यात प्राणवायू सिलिंडर, बेड, व्हेंटिलेटर, करोना प्रतिबंधक औषधे इत्यादी दहा प्रकारच्या यंत्रसामुग्री, साहित्य व औषधांचा समावेश आहे. आता राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी, तसेच प्राणवायू साठवणुकीसाठी टाक्या खरेदीकरण्याकरिता आमदार निधीतून खर्च करण्यास मान्यता दिली आहे.