गेले महिनाभर कोरोनाचा प्रकोप चालू आहे. पण जिल्ह्यातील राजकीय मंत्री आमदार खासदार नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकूळ निवडणुकीचे राजकारण करण्यात मग्न होते. गोकूळच्या निवडणुकीत पैशाची खैरात चालू होती. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. या काळात रेमडेसीविर इंजेक्शन, कोरोना लस यांची उपलब्धता, शहर व जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची सोय असणारी तात्पुरती रुग्णालय हे सारे प्रश्न न विचारलेले बरे (Kolhapur lockdown update)
उद्यापासून जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन https://t.co/17ORhkpseK via @YouTube
— District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur) May 4, 2021
आज गोकुळची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आल्यानंतर तात्काळ बैठक आयोजित करुन दिनांक 05/05/2021 पासून गेले काही दिवस जिल्ह्यात लसीकरण कार्यक्रम बंद आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी प्रयत्न व जीवाचा आटापिटा करणाऱ्या राजकीय नेत्यांना जनता वैतागली आहे. घराणेशाही, सत्तेची हाव, पैश्याची भूक भस्म्या रोगासारखी वाढतच चालली आहे. (Kolhapur lockdown update)
जोपर्यंत लोकप्रतींनिधींच्या घरातील लोकांना ऑक्सिजन, रेमडिसीवीर याची गरज भासणार नाही तोपर्यंत कोरोनाचे गांभीर्य त्यांना समजणार नाही. बाकी कोरोनाचे सर्व नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत. हम करे सो कायदा हेच चालू आहे जिल्हयात.
सचिन तोडकर (जिल्हा उपाध्यक्ष, बीजेपी)
"कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले महिनाभर गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आणि पर्यायी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सुद्धा तसेच गोकुळच्या 3650 ठराव पैकी 40 हून अधिक मतदारांना को रो ना झाला असताना देखील गोकुळ ची निवडणूक (gokul election) काल पार पडली. आणि आज दिनांक 04/05/2021 रोजी तात्काळ बैठक आयोजित करून वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्याकरिता उद्या दिनांक 05/05/2021 पासून 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करता, म्हणजे तुम्ही सामान्य जनतेला मूर्ख समजत आहात का?… 400 te 500 ठराव धारकांना ऐकत्र करून मतदानाला जाताना वाढत्या रुग्ण संख्येची साखळी दिसली नाही का तुम्हाला?.. 40 कोरोनाबाधित ठरावधारकांना PPE किट घालून मतदान करण्यास तुम्ही भाग पाडले..त्यावेळी कोरोनाचा विसर पडला होता का नेत्यांना? कोल्हापूर मध्ये 1 ही ventilator बेड उपलब्ध नसताना त्यासाठी प्रयत्न करताना तुम्ही सर्व नेते दिसला नाही आणि तुम्ही जनतेला गृहीत धरून मनमानी पद्धतीने निर्णय घेता? ज्या लोकप्रतिनिधीनी स्वताच्या सोयीनुसार लॉक डाऊन करण्याची घोषणा केली आहे त्यांनी लक्षात ठेवा घोडेमैदान लांब नाही.. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे. कोल्हापूरकर खूप हुशार आहेत. त्यांना कोणाला कुठे गाठायचे चांगले माहित आहे…." (स्वप्निल प्रल्हाद बराले, विद्यार्थी आघाडी राज्य संघटक, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य)
- लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! ८ मार्च रोजी डबल पेमेंट –तुमचे नाव त्वरित तपासा!
- India Clinches Champions Trophy Final Spot with a Thrilling 4-Wicket Victory Over Australia
- Anveshi Jain | Top Five Web Series Must Watch Online
- Anveshi Jain: The Rising Star of Ullu Web Series
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: थरकाप उडवणारे फोटो समोर
कोल्हापूर जिल्ह्यात 5 तारखेपासून कडक लॉकडाउन. कोरोना गोकुळ निवडणूक व्हायची वाट बघत होता का ?जशी निवडणूक झाली तसा तो सक्रिय झाला आहे का ? यामध्ये राजकीय नेते असे वागत आहेत जसे की जनता मूर्ख आहे. सत्ता , पैसा , स्वार्थ ,राजकीय प्रतिष्ठा यामध्ये नेते इतके तल्लीन झाले आहेत की त्यांना कोरोना , त्यामुळे होणारे मृत्यू ,उपयोजना काय कराव्या, ऑक्सिजन व्हेंटिलेटर लसची कमतरता याचे काहीच पडलेले नाही. नावापुढे फक्त कोविड योद्धा लावून काही नाही होणार त्यासाठी विचार पण लोककल्याणकारी पाहिजे.
अजिंक्य पुरीगोसावी, करवीर तालुका
ज्या काही निवडणूका झाल्या त्या मधील सर्व विजयी उमेदवाराचे मनपूर्वक अभिनंदन. आता मुद्द्दा हा आहे कि ज्या काळात ह्या निवडणूका झाल्या तो काळ योग्य आहे का ? राजकीय लोकांना खरंच विकास करायचा असेल तर जनतेचा बळी देऊन तो करायचा आहे का? आणि जर जनतेला खरच विकास हवा आहे तर स्वता: तसेच दुसऱ्याचा बळी देऊन तो करून घ्यायचा आहे का ? जनतेन ठरवलं असते तर ते यावर :बहिष्कार टाकू शकले असते पण उलट झाले. याला कोणाला जबादार धरावे हेच कोडं मोठं आहे. योगेश कांबळे . शिरोली दूमाला , करवीर .
सध्या जनता सर्व नियम पाळत असताना त्यांना प्रत्येक वेळेस पूर्ण लाकडं करून का वेठीस धरले जात आहे सर्वसामान्य विक्रेते किरकोळ व्यापारी यांचे मागील वर्षी करणामे कंबरडे मोडले आहे निवडणूक तसे तिथे केळी घालून होते से ते तिकीट घालून व्यापार्यांना व्यापार करू देणे काय अडचण आहे
मंगेश हजारे ,कागल
ताज्या बातम्यासाठी तुमचा Email Subscribe करा
जीवापेक्षा राजकारण महत्वाच असत. जनतेच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास महत्वाचा हे आज निवडणुकीमुळे दिसून आल…उद्या संख्या वाढली तर खर्च उचलणार का ही राजकारणी.? का जबाबदारी घेणार..? प्रवीण मोरे सर, कसबा बावडा