महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय.

राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
आज राज्यात कोरोनाचे 56,286 रुग्ण वाढले आहेत. तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 36,130 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 26,49,757 जण कोरोना संक्रमित झाले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट 82.5 टक्के असून मृत्यूदर 1.77 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 27,02,613 व्यक्ती होमक्वारांटाईन असून 22.661 व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ, दिवसभरात तब्बल 7010 नवे रुग्ण
-दिवसभरात उच्चांकी 7010 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 4099 रुग्णांना डिस्चार्ज
– करोनाबाधित 43 रुग्णांचा मृत्यू, 16 रूग्ण पुण्याबाहेरील
– 999 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,12,382
-ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 48939
नाशिकमध्ये आज विक्रमी वाढ झाली आहे. आज एकूण 6508 रुग्ण वाढले असून 34 जणांचा मृत्यू झासा आहे.
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज 1224 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगरमध्ये आज नव्या 2233 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे.