Friday, October 4, 2024

मंद गतीच्या लसीकरणामुळे युवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटला ठोकले टाळे

- Advertisement -

कोल्हापूर : राज्यात कोल्हापूर जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असतानाच पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे परिसरात लसीकरणाच्या मंदगतीच्या निषेधार्थ पोर्लेतील युवकांनी कोविड सेंटर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटला टाळे ठोकून प्रशासनाचे लक्ष वेधले. (Corona | Slow vaccination prevents youths from knocking on the gate of a primary health center)         

कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली पोर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राला लस पुरवली जात आहे. त्यामुळे काहीवेळेस कोतोली मध्ये लस उपलब्ध असते पण पोर्ले मध्ये पाठवली जात नाही. पोर्ले आरोग्य केंद्रामध्ये सध्या बाहेरून कोविड चे रुग्ण आलेले आहेत.

आरोग्यसेवक पोवार यांना गावातील तरुणांनी लसीकरणासंदर्भात कॉल केले असता त्यांनी कॉल उचलले नाहीत, अशी माहिती गावातील तरूणांनी दिली. तर दुसरीकडे गावातील लोकांना लस उपलब्ध नाही असे सांगतात आणि दवाखान्यातील पदाधिकारीच स्वतः च्या नातेवाईकांना बाहेरून बोलावून लस देत असल्याचा खळबळजनक दावा केला. गावातील किती लोकांना लस देण्यात आली याची माहिती विचारली असता तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी अद्यापही अशी माहिती दिलेली नाही.

धनंजय महाडीक यांच्याकडून कोल्हापूरात 120 बेडचे कोविड सेंटर | लहान मुलांसाठी 20 राखीव बेड

प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून अजून नोंद नाही.
"करोडो रुपये खर्च करून पोर्ले गावात भव्य अशी इमारत उभी केली आहे. पण अजूनही याला प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून नोंदणी झालेली नसल्याने कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गतच राहावं लागतं आहे. लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून मान्यता मिळायला हवी जेणेकरून गावातीलच नाही तर बाहेरील गावातील लोकांचीही सोय होईल."
संजय चौगुले

पोर्ले आरोग्य केंद्रात लस ठेवण्यासाठी फ्रिजर नसल्याचे कारण सांगत लस उपलब्ध करण्यात प्रशासनाची ढिसाळपणा दिसून येत आहे. तर आरोग्य आधिकारी लसीकरणाबाबक हात वर करत आहे. लसीबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आठवडाआठवडाभर लस मिळत नसलेच्या रागातून पोर्ले गावातील काही युवकांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी कोविड सेंटर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकून आरोग्य विभागाच्या कारभाराबाबक संताप व्यक्त करत तासभर रूग्णांना वेठीस धरले. त्यांनतर खडबडून जागी झालेल्या आरोग्य यंत्रणेने तुर्तास १५० डोस आणि उपल्बधतेनुसार पोर्ले परिसराला लसीचे डोस वाटप करण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles