Monday, November 11, 2024

CORONA update| MPSC चे विद्यार्थी चिंतेत

- Advertisement -

बिहार सारख्या राज्याने त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पूढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र मध्ये तर मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढत आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससी च्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

पुण्यातील विद्यार्थ्यांची सध्य परिस्थिती

MPSC चा अभ्यास करणार्‍या खूप विद्यार्थी कोरोना ची लक्षणे दिसत आहेत. त्यापैकी खूप मुले सर्दी, ताप, खोकला, असून ही अंगावर काढत आहेत. परीक्षेला अजून सहा दिवस राहिलेले आहेत. विद्यार्थी अभ्यासिकेत जावून अभ्यास करत आहेत. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना धोका निर्माण होत आहे. ज्याला लक्षणे आहेत असे कोणीही स्वत:हून समोर येत नाही. कारण त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल अशी भीती वाटत आहे त्यांना. पण तोपर्यंत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नुकताच पुण्यात वैभव शितोळे या विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आता सर्वजण सावध झालेले आहेत. आम्हाला आमचा जीव महत्वाचा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता ही परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी जोर धरत आहे.

तरुणांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तरुण गटाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाय शोधून कठोर पाऊले सरकारला उचलावी लागणार आहेत.

११ April ची MPSC combined पुढे जाणे खूप आवश्यक आहे. कारण सध्या Hospital मध्ये खूप गंभीर परिस्थिती आहे व लस ४५ वयाच्या पुढेच भेटते. ज्याला कोरोना होता त्यालाच भोगावे लागत व त्यालाच आर्थिक भार उचलावा लागतो. ते इतराना झाल्या शिवाय समजत नाही. Mpsc / शासन कोरोना झालेला विद्यार्थीचा खर्च करणार असेल तरच exam घ्या. नाहीतर महिनाभर exam पुढे ढकला. ह्या Exam ला वयाचा problem शासनाने ठेवलेला नाहीच. त्यामुळे कुणीच चिंता करण्याची गरजही नाही. कृपा करून महिनाभर Exam पुढे ढकलून स्वतःचा व इतराचा विचार करावा हि नम्र विनंती .

अजित दिघे, एमपीएससी विद्यार्थी

राज्यसरकारचा मागील अनुभव

14 मार्च ला होणारी राज्यसेवा पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती, म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केलीत. शेवटी सरकारला नवीन तारिख जाहीर करायला भाग पडले. हा अनुभव लक्षात घेता राज्य सरकार येत्या रविवारी होणार्‍या संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये हस्तक्षेप करणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकार आयोगाशी बोलून योग्य तोडगा काढेल अशी आशा विद्यार्थ्यांमध्ये आहे.

कोरोना मुळे परिस्थिती वेळोवेळी बदलत असते. कालची परिस्थिती आज कायम राहत नाही. त्यामुळे मागे लावलेल्या कसोट्या आज लागू पडत नाही. देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्येत वेगानं वाढ

महाराष्ट्रात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोव्हिडच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं, पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.

जगातील चौथा hotspot महाराष्ट्र झाला आहे


खर म्हणजे आता परीक्षा पुढे ढकलण्याची खरच गरज आहे. परीक्षेला 7 दिवस बाकी आहेत. अशीच रुग्णसंख्या वाढली तर ती 70-80 हजार पर्यंत जाईल. कितीतरी मुलं स्वतः पॉसिटीव्ह आहेत. पण परीक्षा आहे म्हणून लपवून राहिलेत किंवा अंगावर काढून राहिलेत.
त्यामुळे किमान 1-दीड महिना परीक्षा पुढे जावी.

सुमित कोरने
चंद्रपूर

दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण वाढत आहे . मध्य प्रदेश सरकार आणि बिहार सरकारने कोरोनाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या लोकसेवाआयोगाच्या सर्व परीक्षा समोर ढकल्या आहे. तर महाराष्ट्र गव्हर्मेंट ने mpsc च्या परिक्षा एक ते दीड महिन्यासाठी समोर ढखलाव्यात जेणेकरून आपल्याला कोरोना ची साखळी तोडण्यास मदत होईल आणि कोरोना ची प्रमाण कमी होईल.

डिगांबर पाटील, औरंगाबाद

प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवाचा आहे, पूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने धुडगूस घातलेला असताना विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळणे बरं नव्हे.
सरकारने हा विषय संवेदनशीलपणे हाताळून परिणामी कठोरपणे निर्णय घेऊन संयुक्त पूर्वपरीक्षा कमीत कमी एक महिना पुढे ढकलावी ही आमची सरकारला विनंती आहे.

अविनाश दांडगे, औरंगाबाद

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यसरकारने योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. जर परीक्षा होणार असेल तर त्यासाठी काय नियोजन केलेलं आहे ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे आहे.

Related Articles

2 COMMENTS

  1. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजे,त्यामुळे परिक्षा पुढे गेली पाहिजे. सर्व विद्यार्थी अनुकूल वातावरणातच असायला हवी, तरच रोजगाराची समान संधी मिळाली असे म्हणता येईल. आयोग आमची परीक्षा नाही तर जीव घेणारी अग्नीपरिक्षा घेत आहे. कृपया 11 एप्रिल ची MPSC परिक्षा postponed करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles