Tuesday, July 9, 2024

Corona update | रक्तदान करत युवा मोर्चाने जपली सामाजिक बांधिलकी

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतेक सर्व रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा दिसून येत आहे. राज्यातील अपुरा रक्तसाठा लक्षात घेता युवा मोर्चाने विविध जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते.

भारतीय जनता युवा मोर्चा महानगर च्या वतीने कोरोना सारख्या महाभयंकर वैश्विक महामारीच्या संकटसमयी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बिकट परिस्तिथी असताना युवा मोर्चाने कोल्हापूरात रक्तदान शिबीर  व प्लाझ्मा डोनेशन करण्यासाठी जनजागृती व रजिस्ट्रेशन शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. 

 राज्यातील अपुरा रक्तसाठा लक्षात घेता युवा मोर्चाने विविध जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. जोपर्यंत महाराष्ट्र कोरोनामुक्त होत नाही, तोपर्यंत युवा मोर्चा जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत राहील.

विवेक सुभाष वोरा (संघटन महासचिव, युवा मोर्चा )

भारतीय जनता युवा मोर्चा च्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ह्या शिबीरा प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबीर यशस्वी केले तसेच हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रदेश सदस्य विराज चिखलीकर आणि संघटन महासचिव विवेक सुभाष वोरा यांनी विषेश प्रयत्न केले. तर सदर कार्यक्रमास भाजप चे नेते मा.महेश जाधव व जिल्हाध्यक्ष मा.राहुल चिकोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य प्रसाद मोहीते उपाध्यक्ष वल्लभ देसाई, सुनील पाटील, मयुर कदम सचिव रोहीत कारंडे,प्रेम काशीद,निखील पजई संदीप कुंडले विद्यार्थी आघाडीचे विवेक राजवर्धन निरंजन घाटगे मंडल अध्यक्ष सचिन मुधाळे, अमित शिंदे, अमृत काशीद यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles