Rajaram Election|नऊ उमेदवारांच्या करिता कोर्टात, बाकीचे वाऱ्यावर !

Rajaram SakharKarkhana

कोल्हापूर : येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Rajaram Election) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सतेज उर्फ बंटी पाटील गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरले असून यामुळे सत्ताधारी गट व विरोधी गटात कलगी-तुरा सुरू झाला आहे. उन्हाचा तडाक्यासोबत राजारामच्या निवडणुकीने कोल्हापूरचे तापमान आणखी वाढले आहे.

अपात्र उमेदवारांवरुन सत्ताधारी अर्थात महाडिक गटाला घेरण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडून करण्यात येत असून सत्ताधारी रडीचा डाव खेळत असल्याचे विधान केले आहे. याला प्रतिउत्तर देताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी “सभासद अपात्र करण्यासाठी प्रयत्न करणारे यांनी निदान उमेदवारी अर्ज भरताना कागदपत्रांची पूर्तता तरी करावी, इतकी समजूत नसावी.” असा उपरोधिक टोला लगावला.

नऊ उमेदवारांच्या अपात्रतेविरोधात विरोधी गटाने दाद मागितली. परंतू उर्वरित २० अपात्र उमेदवार यांना मात्र वाऱ्यावर सोडले, मग सभासद यांचे काय होईल ? असा सवाल सत्ताधारी गटाकडून करण्यात आला असून यावर विरोधी गटाने मौन बाळगल्याने चर्चेला उधाण आले. (Rajaram Election) याचे पडसाद सोशल मिडियावर उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here