Tuesday, March 19, 2024
No menu items!
HomeCovid19 | 'Special OPS' मधील बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन

Covid19 | ‘Special OPS’ मधील बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन

चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी बिक्रमजीत यांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

- Advertisement -

लोकप्रिय अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjeet Kanwarpal) यांचे कोरोना (corona) संसर्गाने निधन झाले. वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर अभिनयात पदार्पण

बॉलिवूडमध्ये (Bollywood ) पदार्पण करण्यापूर्वी बिक्रमजीत हे सैन्यामध्ये कार्यरत होते. (Actor Bikramjeet Kanwarpal Corona) २००३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी ‘पेज ३’, ‘डॉन’, ‘मर्डर २’, ‘क्रिएचर’, ‘आरक्षण’, ‘टू स्टेट’, ‘द गाझी अटॅक’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ‘ये है चाहतें’, ‘स्पेशल ओपीएस’, ‘अदालत’, ‘दिया और बाती हम’, ‘क्राईम पेट्रोल दस्तक’ या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. (Special OPS)

चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांनी बिक्रमजीत यांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. ‘कोरोनामुळे अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाल्याचे ऐकून दु:ख झाले. माजी सैन्य अधिकारी बिक्रमजीत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे’ असे लिहित त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

बिक्रमजीत कंवरपाल यांचे चित्रपट

  • पेज थ्री
  • पाप
  • करम
  • कॉर्पोरेट
  • हायजॅक
  • आरक्षण
  • मर्डर टू
  • रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ दि इयर
  • द गाझी अटॅक
  • टू स्टेट्स
  • जब तक है जान
  • ग्रँड मस्ती
  • हे बेबी
  • प्रेम रतन धन पायो
- Advertisement -
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular