पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा होण्याचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. (vaccination)
तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांनी यापूर्वीच पत्रकारांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनेही त्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारं पत्र थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकाराचे लसीकरण करण्याबाबत आता राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra corona update)
बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाच्या संकटकाळात आपण अत्यंत संयमाने महाराष्ट्राची काळजी घेत आहात. अनेक लोकोपयोगी निर्णय आपण घेतले आहेत. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत आहे. एक विषय मात्र आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे.(corona vaccination )
“पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.” असे ट्वीट ही बाळासाहेब थोरात (balasaheb thorat)यांनी केले आहे. (Maharashtra corona update)