भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

   टाकळी सिकंदर: आज भीमा(Bhima) सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन खासदार धनंजय भीमराव महाडिक व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुंधती महाडिक या उभयंताचे व मच्छिंद्र शंकर टेकळे, अंबादास धोंडीबा भोसले, हरिभाऊ दामू चवरे, पंडित आनंदा बाबर, दिलीप चव्हाण या पाच ज्येष्ठ सभासद यांचे हस्ते संपन्न झाला.

       यावेळी आगामी २०२२/२३ साठी गळीतास येणाऱ्या उसास २१०० रुपये अगाउ बील व FRP प्रमाणे दर तसेच सन २०२१/२२ या हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन शंभर रुपये तर २०२२/२३ या गळीत हंगामात येणाऱ्या उसाला पहिली उचल २ हजार १००रुपये देण्यात येणार आहे इतर कारखान्याचा दर व वजन तपासून पहा. अन्यथा गडबड खूप महागात बसेल असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी केले. मागील बिलाचे अन् चालू वर्षीचे ५० रुपये दिवाळीपूर्वी अन् ५० रुपये दिवाळी नंतर दिले जातील. तसेच सभासदांना दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारी साखर दिवाळी पूर्वी दिली जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सध्या इथेनॉल निर्मितीसाठी सरकार अधिक भर देत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मदत करण्यास सकारात्मक आहेत. त्यामुळे ‘भीमा'(Bhima) कारखान्याला इथेनॉल व वीजनिर्मिती करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. येणाऱ्या हंगामी वर्षात हे दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास जाऊन सभासद यांना दरवाढ देता येईल, असेही खासदार धनंजय महाडिक म्हणाले. 

         यावेळी युवा नेते विश्र्वराज भैया महाडिक, व्हा. चेअरमन सतीश आण्णा जगताप, उपाध्यक्ष सतीश जाधव, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, विजय महाडिक,शंकर वाघमारे, सुरेश सावंत, विक्रम डोंगरे,संतोष खुळे, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, छगन पवार, दिगंबर माळी, तात्या नागटिळक, आनंदा चव्हाण, हरिभाऊ काकडे, गंगाधर चवरे, मनोहर पवार, पांडुरंग ताठे, भारत पाटील, राजू बाबर, मनोहर पवार, झाकीर मुलाणी, बंडू शेख, संचालक राजेंद्र टेकळे, तुषार चव्हाण, दिलीप रणदिवे, श्री पुदे, भीमराव वसेकर, भाऊसाहेब जगताप,संतोष खुळे, धनंजय देशमुख यांच्यासह सभासद, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार पांडुरंग ताठे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here