सरळसेवा भरतीसाठी राज्य सरकारने TCS/IBPS या संस्थांची नेमणूक केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य तर्फे स्वागत करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यापासून mpsc समन्वय समिती या निर्णयासाठी युद्धस्तरावर प्रयत्नात होती, MPSC अथवा TCS/IBPS द्वारेच सरळसेवा घ्यावी यासाठी त्यांचा आग्रह होता. MKCL ला विरोध करण्यात त्याप्रमाणे MKCL या संस्थेचे नाव सरळसेवेसाठी नाही त्याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत. सरकारला या निर्णयापर्यंत आणण्यासाठी गेल्या पाच वर्षापासूनची mpsc समन्वय समितीची लढाई कारणीभूत आहे. महापरिक्षा पोर्टलचा लढा, त्यानंतर विविध पेपरफुटी प्रकरणे बाहेर काढल्याने सरकारला पारदर्शक पद्धती अवलंबण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
✅ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार; या माध्यमातून ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 20, 2022
✅ ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंडमाफ करणार. भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार.
मागील तीन-चार दिवसापासून mpsc समिती सामान्य प्रशासन विभागाच्या संपर्कात होती. सरळसेवा SOP बद्दल आम्ही दिलेली निवेदनांचा विचार करण्यात येईल असे आम्हाला सांगण्यात आले आहे, त्यातील अनेक गोष्टी येणाऱ्या GR मध्ये असण्याची शक्यता आहे. समन्वय समितीच्या निवेदनाला गंभीरपणे घेण्यासाठी आम्ही सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव नितीन गद्रे साहेब यांचे आभारी आहोत. आधीपासून आम्ही सांगितल्याप्रमाणे आधी GAD चा GR येईल त्यानंतरच ZP भरती बद्दल निर्णय होईल. अपेक्षेप्रमाणे आता ग्रामविकास विभागाने ZP बद्दल सद्यस्थिती तसेच वेळापत्रक/GR जाहीर करायला हवी अशी मागणीही mpsc समन्वय समितीने केली आहे.