Monday, March 20, 2023
No menu items!
Homeकोल्हापूरशिरोली नाका ते पंचगंगा नदीपर्यंत उड्डाणपूल उभारणीसाठी प्रयत्न करणार : खा. धनंजय...

शिरोली नाका ते पंचगंगा नदीपर्यंत उड्डाणपूल उभारणीसाठी प्रयत्न करणार : खा. धनंजय महाडिक 

कोल्हापूर : येथील बहुचर्चित असणारा शिरोली जकात नाका ते पंचगंगा नदी (flyover from Shiroli Naka to Panchganga) पुलापर्यंतच्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांना केले. तसेच यासाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयातून त्याला मंजुरी घेऊ, अशी ग्वाही यावेळी खासदार महाडिक यांनी दिली. तसेच कोल्हापूरात पार्किंगचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. शहरात ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा व्हावी, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावेत. व्हिनस कॉर्नर गाडीअड्डा आणि गोकुळ हॉटेल शेजारी बहुमजली पार्किंग उभारणीबाबत विचार करावा. सयाजी हॉटेलशेजारी असणार्‍या केएमटी पार्किंगच्या जागेत खासगी बसेसना पार्किंगची जागा उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. परीख पुलाला पर्याय म्हणून दुसर्‍या भुयारी पुलाला रेल्वेने मंजुरी दिलीय. महापालिकेने त्यासाठी १० लाख रुपये भरले आहेत. मंजूर असलेला पादचारी उड्डाणपूलही लवकरच उभारला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी नमूद केले. महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा चांगला होण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करू, असे खासदार महाडिक यांनी बोलून दाखवले. आढावा बैठकीला माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, शेखर कुसाळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular