तलाठी भरती २०२३
महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि. २६/०६/२०२३ पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा शुल्क जमा केलेले आहे अशा उमेदवारांकडून जास्तीचे शुल्क परतावा मागणी केलेली आहे.
पेपर फुटीवर कायदा करणे ही काळाची गरज -जितेंद्र आव्हाड |Talathi Bharti
त्यानुसार एकाच नोंदणीक्रमांकाकरीता (Registration Number) एका पेक्षा अधिक वेळा शुल्क विभागाकडे प्राप्त झालेले अशा उमेदवारांचे जास्तीचे जमा झालेले शुल्क विभागकडून खात्री/पडताळणी अंती परतावा करण्यात येणार आहे.
सदर शुल्क परतावा हा उमेदवाराने ज्या बँक खात्यातुन शुल्क अदा केले आहे त्याच बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त ७ दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे.
तांत्रिक कारणामुळे तलाठी भरती तसेच सहकार भरती मध्ये डबल फीस भरलेल्या मुलांची फीस बाबतीत संबंधित विभागाने नोटिफिकेशन काढून लवकरात लवकरच ज्या खात्यातून payment केली त्या खात्यात पैसे परत करावेत अशी मागणी विद्यार्थ्यानी केली होती.
वनभरती मध्ये फीस जशी परत मिळेल असे नोटिफिकेशन वन विभाग कडून आले, तसेच नोटिफिकेशन तलाठी आणि सहकार विभाग कडून यायला हवे. अस विद्यार्थ्यांचे मत होते.