Saturday, July 27, 2024

अनेक आरोग्य समस्यांवर उपयुक्त असे आले; जाणून घ्या याचे लाभदायी गुणधर्म

- Advertisement -

आपल्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थांमध्ये सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. बर्‍याच प्रकारच्या आहारातही त्याचा वापर केला जातो. मुख्यत्वे हिवाळ्यामध्ये तर याचा खूपच चांगला उपयोग होतो. आलं हा मुळातच कफनाशक आणि शरीराला उष्ण ठेवणारा पदार्थ आहे. संक्रमण, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यात शोगॉल, पॅराडोल, झिंगरोन आणि जिंझरोल यांसारखे अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहाची चव वाढवण्यासाठी तसेच आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी चहामध्ये आले वापरले जाते. बर्‍याच प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये आल्याचा वापर होतो. आले हे पोटात दुखण्यापासून कर्करोगापर्यंतच्या अनेक समस्या रोखण्यासाठी कार्य करते.

जाणून घ्या याचे लाभदायी गुणधर्म

  • आल्यामध्ये व्हिटॅमिन के असते. आले हृदयरोग तसेच झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत म्हटले जाते. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका रोखण्यात आल्याची फार मोठी मदत होते.
  • बऱ्याच जणांना खाज अथवा यीस्ट इन्फेक्शन होत असतं. यावरही आलं हे गुणकारी आहे. जे अॅथलिट असतात त्यांच्या पायांना खाज येण्याचं प्रमाण जास्त असतं. यावर आलं हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असणाऱ्या अँटिफंगल घटकांमुळे हा आजार लवकर बरा होतो. त्वचेवर फंगस इन्फेक्शन कमी करण्यासाठी असणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये आढळतात. एका अभ्यासात सिद्ध झालं आहे की, साधारण 29 अँटिफंगल मसाल्याच्या झाडांमधून आल्याच्या झाडात जास्त अँटिफंगल गुणधर्म असतात.
  • आल्यामध्ये जिंझोल नावाचा एक कंपाऊंड असतो. हा घटक ओवेरियन, प्रोस्टेट आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवतो.
  • आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे जळजळ संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते. आपण जळजळ, सूज, तीव्र वेदना, सर्दी यांसारख्या व्याधींनी त्रस्त असल्यास आल्याचे सेवन करू शकता. सूज आल्यास त्यावर आल्याचा दाह हा प्रभावी उपचार आहे. आले हे एक नैसर्गिक वेदनानिवारक म्हणूनदेखील ओळखले जाते.
  • आल्याचे सेवन केल्याने अन्न विषबाधा, लूज मोशन, सर्दी आणि ताप यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. आल्याचे नियमित सेवन पचनव्यवस्था तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.
  • ब्राउन शुगर आणि आल्याचा चहा पिल्याने मासिक पाळीदरम्यान वेदना आणि पोटातील दुखणे दूर होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर विजय मिळविण्यासाठी आपण आल्याचे सेवन करू शकता. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल कि रोजच्या वापरात असलेले आले आपल्याला किती उपयुक्त ठरू शकेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles