धुळे: राज्याचे ग्रामविकास मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि विद्यार्थी यांच्यामध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती बाबतच्या (girish mahajan audio clip) संभाषणाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली. ‘काम नाही का रे तुम्हाला काही सणासुदीच्या दिवसांत; दिवसभरातून ५०० फोन लावता. काही करत नाही मी, रद्द झाली ती परीक्षा. रद्द केली, फोन ठेव’, अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या आरोग्य पदभरतीबाबब माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला ग्रामविकास व धुळेचे पालकमंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. याबाबत अजून कोणतीही पुष्टी झाली नसून यावरून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर गिरीश महाजन यांच्यावर टीका करत आहेत.
धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री गिरीश महाजन असताना पत्रकारांनी याबाबत त्यांना विचारले असता, मला जाणीवपूर्व अशा प्रकारच्या गोष्टींमधून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. शिक्षण विभाग माझ्याकडे नसून त्याचे काम दीपक केसरकर हे पाहतात. शिक्षक भरतीचा विषय लवकरच मोकळा होणार असून याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यावरून यापूर्वीही ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. जरी या व्हायरल ऑडियो क्लिपची (girish mahajan audio clip) पुष्टी झाली नसली तरी ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे.