Saturday, March 18, 2023
No menu items!
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी | 2185 मराठा विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्ती द्या- आ. चंद्रकांत पाटील

मोठी बातमी | 2185 मराठा विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्ती द्या- आ. चंद्रकांत पाटील

पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू, तुमचे परिश्रम वाया जाऊ देणार नाही...

मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. याच काळामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी महाराष्ट्र राज्यात विविध विभागांच्या भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्या. परंतु कोविड या एकाच कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्रक दिली नाहीत. (give immediate appointment to maratha students- chandrakant patil)

त्यामुळे राज्यातील जवळपास विविध विभागातील २१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री या नात्याने २१८५ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण गांभीर्यपूर्ण विचार करून उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकरात लवकर मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे केली आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हंटले आहे की, ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख आहे. सध्या लॉकडाऊन, कोरोना संकट, बेरोजगारी अशा परीस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करून कष्टातून यश मिळवून देखील त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. ’ (maratha reservation)

नोकर भरतीच्या update साठी तुमचा Email Subscribe करा.

मुख्यमंत्री या नात्याने 2185 उमेदवारांना त्वरित नियुक्त्या देण्याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून नियुक्त झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळेल. सध्या त्या उमेदवारांची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असून राज्य सरकारने त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. give immediate appointment to maratha students- chandrakant patil

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular