Gokul Election : विरोधी आघाडीतील पाचही उमेदवार आघाडीवर

Live Janmat

अखेर दीड वर्षापासून रखडलेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे.(Gokul Election Kolhapur Result)

सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे. (Gokul Election Kolhapur Result)

  • 11.30 वाजता 650 मतमोजणी पूर्ण. विरोधी आघाडी शंभर मताने पुढे
  • पहिल्या फेरीत विरोधी आघाडी चे राखीव गटातील सर्व उमेदवारी 40 ते 65 मतांनी आघाडीवर
  • माझी आमदार सुजित मिणचेकर आघाडीवर
  • अंजना रेडेकर सुष्मिता राजेश पाटील आघाडीवर

कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकूळ कोणाकडे राहणार याचा फैसला आज होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 70 केंद्रांवर हे मतदान पार पडलं. या मदनान प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयानं कोरोना संकटात निवडणूक घेण्यासाठी जे आदेश दिले होते त्या आदेशांचं पालन करत हे मतदान पार पडलं. आज प्रत्यक्ष मतमोजणी पार पडणार आहे. अनेक मंत्री, खासदार, आमदारांनी निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतल्यानं निवडणुकी चुरशीची झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावर जोरदार आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे या निवडणुकीत रंग भरला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं निकालाची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला लागली आहे. (Gokul Election Kolhapur Result)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here